Wednesday, June 12, 2013

एसटी हिरकणीच्या नावाखाली लुटालुट

एसटीने स्वारगेट ते ठाणे non-stop बससेवा सुरु केली आहे त्यात इतके काही त्रास आहेत पण एसटीला ग्राहकांना लुटुन स्व:ताचा खिसा भरायचा आहे.

खालील त्रासदायक गोष्टी
१. अतिजलद/non-stop च्या नावाखाली विनाकंडक्टर गाडी प्रत्येक थांब्याला १५ ते २० मिनिटे टिकिट काढायला प्रवासी बसण्यासाठी थांबते. स्वारगेट ते वाकडच्या मधे असे ८ थांबे आहेत. यासाठी एकुण १ तास तरी गाडी अशीच थांबते. याव्यतिरिक्त फुडमाल ला गाडी २० ते २५ मिनिटे  थांबते. अशाप्रकारे ३ तासाच्या पुणे - मुबंई प्रवासाला ४ ते ५ तास जातात.

चला ही झाली एकबाजु पण याव्यतिरिक्त पैशाचीही लुटालुट

२. याचे टिकिट चे मशिन असे आहे की तुम्ही कोणत्याही थांब्याला  बसा वा उतरा टिकिट  फक्त एकच १९५/-
मग तुम्ही स्वारगेट ला बसुन कळंबोलीला उतरा (ज्याची नाहीतर तिकिट १३० वैगेरे असते)  किंवा वाकड ला बसुन ठाण्याला उतरा (ज्याची टिकिट १५० वैगेरे असते)  तुम्हाला  १९५/- रुपयेच द्यावे लागतात. हि लुट का हे मला अजुन तरी कळाले नाही.

कंडक्टरला विचारले तर ते म्हणतात मशिनच असे बनवलेय आता प्रवशांनी दाद मागवी तर कुणाकडे? आणि जर तेच टिकिट तुम्ही इंटरनेट वर बुक केले तर बरोबर पैशाचे टिकिट मिळते असा भेदभाव का?

अशाप्रकारचे त्रास वोल्हो बससेवेसाठी पण आहेत पण अजुन पर्यंततरी काहीच बदला झाले नाही.